आजपासून अर्थमंत्री निर्मला सितारामन तीन दिवसीय श्रीलंका दौऱ्यावर
नवी दिल्ली: आजपासून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन या तीन दिवसीय श्रीलंका दौरा करणार आहेत असे अर्थमंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे. तामिळनाडू मूळ असलेल्या तमिळ भाषिक लोकांनी श्रीलंकेत २०० वर्षांपूर्वी स्थलांतर केले होते. या घटनेला २०० वर्ष झाल्याबद्दल अर्थमंत्री निर्मला सितारामन कोलंबो येथील श्रीलंका येथे आज उपस्थितांना भाषण करून संबोधित करतील.
श्रीलंकेचे अध्यक्ष रनिल विकरेमेसिंघे, श्रीलंकेचे प्रधानमंत्री दिनेश गुनवरदना, पाणी पुरवठा व मूलभूत सुविधा मंत्री जीवन थोंडामन व इतर मान्यवर देखील उपस्थित राहणार आहेत.' Inhancing Connectivity Partnering For Prosperity ' या विषयावर सीतारामन आपले मनोगत व्यक्त करतील.