राज्य सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांना मोठी भेट! आशा स्वयंसेविकांचीही दिवाळी होणार गोड

    03-Nov-2023
Total Views |

st bus


मुंबई :
राज्य सरकारने दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी तब्बल ३८७ कोटींची मदत करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन दिवाळीपूर्वी होण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
यासोबतच राज्य सरकारने आशा स्वयंसेविकांनाही दिवाळीनिमित्त मोठी भेट दिली आहे. आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी याबाबत घोषणा केली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या ८० हजारांहून अधिक आशा स्वयंसेविकांच्या मानधनात वाढ करण्यात येणार आहे. याद्वारे आशा स्वयंसेविकांच्या मानधनात ७ हजार रुपये, तर गट प्रवर्तकांच्या मानधनात ६,२०० रुपयांनी वाढ करण्यात येणार आहे. तसेच आशा स्वयंसेविका आणि गट प्रवर्तकांना २००० रुपये दिवाळी बोनसही देण्यात येणार आहे.