‘IFFI’त‘कांतारा’साठी रिषभ शेट्टीला विशेष ज्यूरी पुरस्कार; कन्नड चित्रपटाचा प्रथमच झाला असा सन्मान

    29-Nov-2023
Total Views |

kantara 2 
 
मुंबई : करोनाकाळानंतर दाक्षिणात्य चित्रपटांनी प्रेक्षकांना भूरळ घातली आहे. यातही प्रामुख्याने कन्नड चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई केली. यात ‘केजीएफ चॅप्टर १ आणि २’ आणि रिषभ शेट्टीच्या ‘कांतारा’ने तुफान कमाई केली होती. दरम्यान, केवळ १६ कोटींमध्ये तयार झालेल्या ‘कांतारा’ने जगभरात ४०० कोटींहून अधिक कमाई केली. नुकताच या चित्रपटाच्या पुढच्या भागाची अर्थात ‘कांतारा अ लेजेंड -चॅप्टर १’ ची पहिली झलक देखील प्रदर्शित करण्यात आली असताना ‘५४ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’त ‘कांतारा’साठी रिषभ शेट्टीला विशेष ज्यूरी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर महत्वाची बाब म्हणजे ‘IFFI’मध्ये पुरस्कार मिळवणारा रिषभ शेट्टीचा ‘कांतारा’ हा पहिला कन्नड चित्रपट ठरला आहे.
 
याबद्दल आपले मनोगत व्यक्त करताना रिषभ शेट्टी म्हणाला, “कांतारा हा आपल्या मुळांशी जोडलेला चित्रपट होता त्यामुळेच तो लोकांना आपलासा वाटला. आज तो चित्रपट ज्या स्तरावर आहे तो केवळ आणि केवळ भारतीय प्रेक्षकांमुळे आहे.” याबरोबरच सध्या भाषेच्या सीमा पार करून प्रादेशिक चित्रपट जगभरात पोहोचत आहेत व त्यांची दखलही घेतली याचा आनंद आहे.”
 
 
 
‘कांतारा अ लेजेंड -चॅप्टर १’ हा चित्रपट कन्नड, तमिळ, तेलुगू,मल्याळम, हिंदी, बंगाली आणि इंग्रजी अशा सात भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. अद्याप चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेबद्दल कोणतीही माहिती समोर आली नसली तरी २०२४ च्या अखेरपर्यंत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.