मुंबई : आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित आणि आमिर खान निर्मित 'लगान' चित्रपटाचे सिनेमॅटोग्राफर गुरुराज जोईल यांचे बंगळूरमध्ये दुख:द निधन झाले. वयाच्या ५३ व्या वर्षी ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे हिंदी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.
आमिर खान प्रोडक्शन्सकडून ट्विटरवरुन श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. "गुरुराज जोईस यांच्या निधनाने अतिशय दु:ख होत आहे. एकदम पॅशनेट व्यक्ती ज्याच्या कॅमेऱ्यामागील कामाने 'लगान' ला जीवंत बनवलं. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो'
गुरुराज जोईस यांनी 'मुंबई से आया मेरा दोस्त', 'शूटआऊट अॅट लोखंडवाला', 'मिशन इस्तंबुल', 'एक अजनबी', 'जंजीर', 'गली गली चोर है' यासारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांसाठी सिनेमॅटोग्राफी केली आहे.