मध्य रेल्वेच्या मार्गावर स्वयंचलीत सिग्नल प्रणाली; गाड्यांचा वेग वाढणार!
28-Nov-2023
Total Views |
मुंबई : मध्य रेल्वेने ३९९ किलोमीटर रेल्वे मार्गावर स्वयंचलीत सिग्नल प्रणाली स्थापित केली आहे. मेल एक्सप्रेस ट्रेनचा वेग वाढवण्यासाठी व ज्या क्षेत्रात ट्राफिक जास्त आहे अशा क्षेत्रात परिचालन वाढवण्यासाठी मध्य रेल्वेकडून ही यंत्रणा बसवण्याच काम केल जात आहे. अलिकडेच पुणे-लोणावळा या मार्गावर ही यंत्रणा बसवण्याचे काम पूर्ण झाले.
त्याचबरोबर मध्य रेल्वेच्या इतर मार्गांवरही स्वयंचलीत सिग्नल प्रणाली स्थापित करण्याचे काम सुरू आहे. मध्य रेल्वेने ज्या मार्गांवर स्वयंचलीत सिग्नल प्रणाली स्थापित केली आहे. त्यापैकी 201 किमी मार्ग मुंबई डिवीजन मध्ये आहे. ही यंत्रणा सीएसएमटी-कल्याण, सीएसएमटी-पनवेल, ठाणे-नेरुळ-खारकोपर, कल्याण-कर्जत, कल्याण-टीटवाळा, दिवा-दातिवली आणि दिवा-पनवेल या मार्गांवर बसवण्या आली आहे.
त्याचबरोबर भुसावळ मंडलाच्या जळगाव-भुसावळ-बोडवड, नागपुर डिवीजनमध्ये खापरी-नागपुर-गोधनी आणि पुणे मंडलाच्या लोनावळा-पुणे या मार्गावरील काम देखिल पुर्ण झाले आहे.