कोर्टाच्या निकालापूर्वीच अदानी समूहाचे शेयर तेजीत; अदानी ग्रीन, पोर्टस, टोटल गॅसच्या बाजारमूल्यात १० टक्क्यांनी वाढ

    28-Nov-2023
Total Views |
 Adani share price
 
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयापूर्वी अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअरमध्ये जोरदार वाढ झाली आहे. अदानी ग्रीन, अदानी पोर्टस, अदानी टोटल गॅस, अदानी एनर्जी यांच्या शेयरमध्ये १० टक्क्यांची तेजी आली आहे. तर अदानी विल्मार, अंबुजा सिमेंट आणि एनडीटीव्हीच्या शेयरमध्ये सुद्धा तेजीचे वातावरण आहे.
 
शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणी आपला निर्णय राखून ठेवला होता. २२ प्रकरणांमध्ये तपास पूर्ण झाल्याचे सेबीने सांगितले. आता अर्धन्यायिक अंतर्गत कारवाई केली जाईल. याचिकाकर्त्याने एसआयटी स्थापन करण्याची मागणी वारंवार केली आहे.
 
त्यासोबतच याचिकेत सेबीवर सुद्धा कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. याचिकेनुसार, सेबीने सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या मुदतीत तपास पूर्ण केला नाही, त्यामुळे सेबीविरुद्ध अवमानाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने १७ मे रोजी दिलेल्या आदेशानुसार, सेबीला अदानी हिंडेनबर्ग प्रकरणात १४ ऑगस्टपर्यंत तपास अहवाल सादर करायचा होता.
 
ऑगस्टमध्येच सेबीने २४ पैकी २२ प्रकरणांमध्ये तपास पूर्ण केल्याचे न्यायालयाला सांगितले होते. तपास पूर्ण होण्यास उशीर होण्याचे कारण स्पष्ट करताना सेबीने म्हटले होते की, या प्रकरणातील काही परदेशी कंपन्यांकडून माहिती मिळण्यास विलंब होत असल्याने तपासाला वेळ लागत आहे. त्याच वेळी, ज्यांनी अवमान याचिका दाखल केली आहे, ते वारंवार सेबीच्या तपासात दिरंगाईबद्दल प्रश्न उपस्थित करत होते. आज न्यायालय अदानी-हिडनबर्ग प्रकरणात आपला निर्यण देणार आहे.