नवी दिल्ली : भारतीय संघ आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ करिता पाकिस्तानात खेळण्यास नाही आला तर आयसीसीने आम्हाला नुकसान भरपाई द्यावी, असे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे म्हणणे आहे. दरम्यान, पाकिस्तानात २०२५ साली होणाऱ्या चॅम्पियन ट्रॉफीकरिता भारत न आल्यास भरपाई द्या. त्यासंदर्भात एक करार करण्याची विनंती पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयसीसीला केली आहे. भारतीय संघ राजकीय किंवा सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानात आला नाहीतर या बदल्यात नुकसान भरपाई म्हणून पैसे मिळावेत, यासाठी करार करण्यात यावा, परंतु, अद्याप कुठलाही करार करण्यात आलेला नाही.
दरम्यान, २०२५ साली होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी या आठ संघांच्या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे सोपवण्यात आले आहे, परंतु आयसीसीने अद्याप यजमान करारावर स्वाक्षरी केलेली नाही. तसेच, या सर्व प्रकारामुळे २०२३ च्या आशिया चषकाचे संपूर्ण यजमानपदही पाकिस्तानला मिळणार होते. तथापि, ही स्पर्धा संकरित मॉडेलमध्ये आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये टीम इंडियाचे सर्व सामने तसेच अंतिम सामना श्रीलंकेत हलविण्यात आला होता. अशीच फसवणूक टाळण्यासाठी पाकिस्तानला स्पष्टता हवी असल्याचे यानिमित्ताने समोर येत आहे.