मुंबई : आयपीएल २०२४ हंगामाच्या लिलावापूर्वी सर्व संघाना त्यांच्या खेळाडूंना रिटेन करण्याची संधी दिली जाते. त्यामुळे संघ आता ठरविणार आहेत की, कुठल्या खेळाडूला संघात ठेवायचे आणि कुणाला काढायचे हे आज ठरविले जाणार आहे. तसेच, खेळाडू रिटेन करण्याची आज शेवटची संधी संघांना मिळणार आहे. त्यामुळे कोण कुणाला संघातून डच्चू देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
दरम्यान, आज स्टार स्पोर्टस्च्या आयपीएल २०२४ रिटेंशनवर विशेष शो होणार आहे. दुपारी ४ ते ६ वेळेत हा शो पाहता येणार आहे. तसेच, भारताच्या माजी क्रिकेटर आकाश चोप्रा यांनी Xवर पोस्ट करत म्हटले की, आज ५०+ खेळाडूंना रिलीज होताना आपण पाहू शकतो का?, बर्याच संघांना एक महत्त्वपूर्ण लिलाव पर्स तयार करायचा असे आणि ते आज घडत आहे, असा विश्वास आकाश चोप्रा यांनी व्यक्त केला आहे.