मुंबई : सोनी मराठी वाहिनीवरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमामुळे घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर लग्न बंधनात अडकणार असल्याचे संकेत दिसत आहे. तिनेच तिच्या सोशल मिडिया अकाऊंटवरुन एक पोस्ट करत लग्नाला ६० दिवस बाकी असे म्हटले आहे.
प्रियदर्शनीने एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टमध्ये तिने ‘लग्नाला ६० दिवस बाकी’ #नवरदेव #जानेवारी२०२४ असे तिने लिहिले आहे. दरम्यान, तिच्या या पोस्टवर शुभेच्छांचा देणाऱ्या कमेंट्सचा पाऊस पडला आहे. ‘अगं तु पण लग्न करतेस का?’, ‘उगाच असले Heart Attack देऊ नकोस’ आणि ‘पत्रिकेवर नाव असेल तरच येईल’ अशा गमतीशीर कमेंट्स काही युजर्सने केल्या आहेत. तर अनेकांनी तिला तुझ्या आगामी नाटकासाठी आणि चित्रपटासाठी खूप उत्सुक आहोत, असेही म्हटले आहे.
प्रियदर्शनी इंदलकर मराठी चित्रपटांसह बॉलिवूडमधील काही वेब मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ‘सोयरीक’, ‘भाऊबळी’ आणि ‘फुलराणी’ या मराठी चित्रपटातून तिने उत्कृष्ट भूमिका साकारल्या. तसेच, ॲमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित झालेल्या ‘फर्जी’ या वेब मालिकेमधून तिने हिंदीत पदार्पण केले होते.