मुंबई : जगभरात सध्या युद्ध परिस्थिती असून गेला अनेक काळ रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. आतापर्यंत युद्धात हजारो लोकांचा मृत्यू झाला असून नुकतीच रशियातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका लाईव्ह शोदरम्यान युक्रेनकडून झालेल्या हल्ल्यात रशियन अभिनेत्रीचे जागीच दुर्दैवी निधन झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, युक्रेनमध्ये रशियन सैन्यासाठी परफॉर्म करत असताना अभिनेत्री पोलिना मेन्शिखचा मृत्यू झाला.
माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार युक्रेनने जिथे हल्ला केला ते ठिकाण रशियन-नियंत्रित क्षेत्र असून अभिनेत्री पोलिना मेन्शिखने ज्या रशियन थिएटरमध्ये काम करत होती, तेथील रशियन थिएटरशी संबंधित लोकांनी अभिनेत्रीच्या मृत्यूची माहिती दिली. दरम्यान, हल्ल्याचा एक व्हिडिओदेखील समोर आला आहे.