मी जे केलं ते मुंबईकरांच्या भल्यासाठीच केलं : ईडीच्या दारातून किशोरी पेडणेकर
23-Nov-2023
Total Views |
मुंबई : उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर या चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल झाल्या आहेत. कोरोना काळात मुंबई महानगरपालिकेने खरेदी केलेल्या बॉडी बॅगमध्ये घोटाळा केल्याचा त्यांच्यावर आरोप असून याप्रकरणी त्यांची चौकशी सुरु आहे.
दरम्यान, याआधी किशोरी पेडणेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरेंसोबत असणाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न सुरु आहे. सरकारी संस्थांना कायम सहकार्य केलं पाहिजे असे त्यांनी म्हटले. तसेच मी मुंबईकरांसाठी चांगलंच काम केलं आहे. त्यामुळे अशा चौकशांना सामोरं जाणं माझं काम आहे. खिचडी घोटाळ्याशी माझा संबंध नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
याशिवाय बुधवारी महापालिकेत ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पामध्ये झालेल्या घोटाळ्यात कॉन्ट्रॅक्टरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याविषयी त्यांना विचारले असत्या त्या म्हणाल्या की, जर महानगरपालिकेचे अधिकारी किंवा काँट्रॅक्ट घेणाऱ्यांनी मुंबईतील लोकांच्या जीवनाशी खेळण्याचा प्रयत्न केला असेल तर नक्कीच त्याची चौकशी होऊन ते बाहेर आले पाहिजे. कुठल्याच गोष्टीला पाठीशी घाला असं मी म्हणणार नाही, असेही त्यांनी म्हटले.