मुंबई : दिवाळीत लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडतं काम म्हणजे किल्ला बनवणे. दिवाळीच्या सुट्टीत लहान मुले मोठ्या उत्साहात मातीपासून हा किल्ला तयार करत असतात. याच कलेला चालना देण्यासाठी 'डेव्हलपमेंट फाउंडेशन फॉर महाराष्ट्र'च्या वतीने "किल्लोत्सव किल्ला बांधा स्पर्धा २०२३" आयोजित करण्यात आली होती.
राज्यभरातील हजारो लोकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. लवकरच या स्पर्धेचे बक्षिस वितरणही होणार आहे. यावेळी विजेत्यांना भरघोस पारितोषिकांचे वाटप करण्यात येणार आहे. रोख रक्कम, स्मृती चिन्ह आणि पुस्तक असे या पारितोषिकाचे स्वरुप असेल.
स्पर्धेतील पारितोषिकांचे स्वरुप पुढीलप्रमाणे-
प्रथम पारितोषिक - १०,००० रुपये स्मृती चिन्ह आणि पुस्तक
द्वितीय पारितोषिक - ७००० रुपये स्मृती चिन्ह आणि पुस्तक
तृतीय पारितोषिक - ५००० रुपये स्मृती चिन्ह आणि पुस्तक
उत्तेजनार्थ तीन पारितोषिके - प्रत्येकी २००० रुपये, स्मृती चिन्ह आणि पुस्तक
तसेच स्पर्धेत सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र दिले जाईल. यासोबतच विजेत्यांना स्मृती चिन्ह आणि पुस्तक पार्सलद्वारे घरपोच पाठवले जाणार आहे. यासंबंधी अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करावा.
डेव्हलपमेंट फाउंडेशन फॉर महाराष्ट्र - ९७०२६६१८६७
दैनिक मुंबई तरुण भारत आणि महाएमटीबी हे या स्पर्धेचे माध्यम प्रायोजक आहेत.