क्रेडाई -बीएएनएम मेगा प्रॉपर्टी एक्स्पो २०२३ चे वाशीमध्ये होणार आयोजन
१ डिसेंबर ते ४ डिसेंबर दरम्यान होणार आयोजन; १०० हून अधिक विकासकांचा सहभाग
23-Nov-2023
Total Views |
मुंबई : क्रेडाई -बीएएनएम मेगा प्रॉपर्टी एक्स्पो २०२३, १ डिसेंबर ते ४ डिसेंबर दरम्यान वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. या प्रॉपर्टी एक्स्पोमध्ये १०० हून अधिक विकासक सहभागी होत आहेत. त्यामुळे ग्राहकांना एकाच छताखाली घरांमध्ये मिळणाऱ्या सुविधांची आणि किमतीची तुलना करता येणार आहे.
या मेगा प्रॉपर्टी एक्स्पोमध्ये विद्यमान आणि आगामी काळात विकसित होणाऱ्या संपत्तींचे सुद्धा प्रदर्शन करण्यात येणार आहे. यामुळे नवी मुंबईत होऊ घातलेल्या भविष्यातील प्रकल्पांची सुद्धा यामुळे माहिती मिळणार आहे. या एक्स्पोमध्ये परवडणारी घरे, निवासी मालमत्ता, व्यावसायिक मालमत्ता यासह विविध विभागांमधील मालमत्तांचे प्रदर्शन करण्यात येणार आहे.