ठाणे : प्रदूषण नियंत्रणासाठी मुंबईच्या धर्तीवर ठाणे शहरातील रस्ते पाण्याने धुण्याचे आणि रस्ते धुलाईसाठी प्रक्रिया केलेले पाणी वापरण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. त्यानंतर ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांनी बुधवार पासुन शहरातील सिमेंट काँक्रीटचे रस्ते धुण्यास प्रारंभ केला आहे.
रस्ते धुलाई साठी ठाणे पूर्व कोपरी येथील मलनि:स्सारण प्रकल्पातील प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुर्नवापर करण्यात येत असुन टँकरद्वारे कर्मचारी रस्ते स्वच्छ करीत आहेत. त्यामुळे शहरातील रस्ते धुळमुक्त झाल्याने प्रदुषणात काही अंशी घट झाल्याचे दिसून येत आहे.