मुंबई : कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षांना मंत्री पदाचा दर्जा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. भाजप नेते पाशा पटेल सध्या या आयोगाचे अध्यक्ष आहेत. राज्यातील शेतमालाला किफायतशीर भाव मिळावेत आणि ग्राहकांना वाजवी दरात शेतमाल खरेदी करता यावा, या दुहेरी उद्देशाने राज्य कृषी मूल्य आयोगाची स्थापना करण्यात आली आहे.
दरम्यान, या आयोगाच्या अध्यक्षांना देण्यात आलेली जबाबदारी आणि कामकाजाचे स्वरूप, तसेच केंद्रीय कृषी मूल्य व किंमत आयोगामध्ये करावे लागणारे राज्याचे प्रतिनिधित्व या सर्व बाबींचा साकल्याने विचार करता राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षांना मंत्रिपदाचा दर्जा देण्यात येत असल्याचे राज्य शासनाने म्हटले आहे.