पाक दहशतवाद्यांना मदत करणारे ४ सरकारी कर्मचारी बडतर्फ

जम्मू – काश्मीर प्रशासनाचा निर्णय

    22-Nov-2023
Total Views | 53
Jammu and Kashmir Administration action Servant

नवी दिल्ली :
सरकारी नोकरीत असूनही दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या चार कर्मचाऱ्यांना नोकरीतून काढण्यात आले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये फुटीरतावादी समर्थक कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपावरून चार सरकारी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. निसार-उल-हसन (सहाय्यक प्राध्यापक, औषध, एसएमएचएस हॉस्पिटल, श्रीनगर), हवालदार अब्दुल मजीद भट, उच्च शिक्षण विभागातील प्रयोगशाळा वाहक अब्दुल सलाम राथेर आणि शिक्षण विभागातील शिक्षक फारुख अहमद मीर यांचा समावेश आहे.

बडतर्फ केलेले कर्मचारी भारत सरकारकडून पगार घेत असत. मात्र, पाकिस्तान दहशतवाद्यांना रसद पुरविण्याचे काम या कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत असे. या सर्वांना घटनेच्या कलम ३११ अन्वये बडतर्फ करण्यात आले आहे. सरकारी संस्थांमध्ये काम करताना पाकिस्तानी दहशतवादी संघटनांना मदत केल्याच्या आरोपावरून केंद्रशासित प्रदेश प्रशासनाने गेल्या तीन वर्षांत ५० हून अधिक कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले आहे.

या वर्षी जून महिन्यात काश्मीर विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी, महसूल विभागाचे अधिकारी आणि एका पोलिस कर्मचाऱ्याला पाकिस्तानी दहशतवादी संघटनांसाठी निधी गोळा केल्याच्या आरोपावरून नोकरीवरून काढून टाकण्यात आले होते.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121