मुंबई : आयडीबीआय बँक अंतर्गत मेगाभरती केली जाणार असून या भरतीच्या माध्यमातून पदवीधरांना नोकरीची चांगली संधी निर्माण झाली आहे. आयडीबीआय बँकेकडून जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी नवी संधी मिळणार आहे.
इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया अर्थात आयडीबीआय बँकेने 'ज्यूनियर असिस्टेंट मॅनेजर' आणि 'एक्झिक्युटिव्ह सेल्स आणि ऑपरेशन' या दोन पदांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे. या भरतीद्वारे एकूण २१०० रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. तसेच, 'ज्युनियर असिस्टंट मॅनेजर' पदाच्या ८०० जागा तर 'एक्झिक्युटिव्ह सेल्स आणि ऑपरेशन' या पदाच्या १३०० जागा भरल्या जाणार आहेत.
दरम्यान, आयडीबीआय बँक अंतर्गत होणाऱ्या भरतीकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. आयडीबीआय बँकेतील रिक्त जागांकरिता दि. ०६ डिसेंबर २०२३ पर्यंत अर्ज करता येणार आहे. तसेच, भरतीविषयक अधिक तपशील अर्थात शैक्षणिक पात्रता, अर्जशुल्क याबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी
अधिकृत वेबसाईटला भेट द्या.