सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या मजुरांपर्यंत पोहोचला कॅमेरा! व्हिडीओ आला समोर

    21-Nov-2023
Total Views |

Silkyara Tunnel


देहरादून :
गेल्या आठवडाभरापासून उत्तरकाशीतील सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या मजुरांचा व्हिडीओ आता समोर आले आहेत. पाईपमधून पाठवण्यात आलेल्या एंडोस्कोपिक कॅमेराद्वारे हा व्हिडीओ समोर आला असून सर्व मजूर सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे.

 
१२ नोव्हेंबर रोजी उत्तरकाशीमधील निर्माणाधीन बोगदा कोसळून ४१ मजूर अडकले आहेत. तेव्हापासूनच सहा इंच व्यासाच्या एका पाईपद्वारे त्यांना अन्न, पाणी, औषधे व इतर साहित्य पाठवले जात आहे. यापुर्वी त्यांना केवळ कोरडे अन्नपदार्थ पाठवण्यात येत होते. परंतू, आता खिचडी आणि इतर शिजवलेले पदार्थ पोहोचवण्यातही यश आले आहे.
 
दरम्यान, याच पाईपद्वारे मजूरांपर्यंत एक कॅमेरा पाठवण्यातही बचाव पथकाला यश आले आहे. या कॅमेऱ्यामुळे बोगद्यात अडकलेल्या मजुरांचा व्हिडीओ पुढे आला आहे. यामध्ये सर्व मजूर निरोगी आणि सुरक्षित असल्याचे दिसत आहे. या बोगद्यात एन्डोस्कोपिक फ्लेक्सी कॅमेरा पाठवण्यात आला आहे. प्रत्येक मजुराची स्थिती कॅमेऱ्याद्वारे जाणून घेतली जात आहे.

 
याशिवाय आंतरराष्ट्रीय बोगदा तज्ज्ञ अर्नोल्ड डिक्स हेदेखील घटनास्थळी पोहोचले आहेत. मजूरांना लवकरच बाहेर काढण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच बोगद्याची पाहणी करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाची रोबोटिक्स टीमही पोहोचली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी या घटनेवर सातत्याने लक्ष ठेवून आहेत.