ChatGPTला मायक्रोसॉफ्टचा दणका! बरखास्त सॅम ऑल्टमॅन त्वरीत कंपनीत रुजू होणार!

    20-Nov-2023
Total Views | 226
Sam Altman to join Microsoft

वॉशिंग्टन
: OpenAIच्या CEO पदावरुन बरखास्त केल्यानंतर सॅम ऑल्टमॅन आता मायक्रोसॉफ्टमध्ये रुजू होणार आहे. स्वतः मायक्रोसॉफ्टचे CEO सत्या नाडेलांनी Xवर पोस्ट करत याबद्दल माहिती दिली. ऑल्टमॅनसह ग्रेग ब्रॉकमैन (Greg Brockman) सुद्धा मायक्रोसॉफ्टसोबत काम करणार आहेत. अधिक माहितीनुसार, सॅम ऑल्टमॅन आणि ब्रॉकमॅन मायक्रोसॉफ्टच्या एका नव्या A। रिसर्च टीमचं नेतृत्व करणार आहेत.
 
OpenAI कंपनीतील संचालक मंडळाने १७ नोव्हेंबर रोजी CEO ऑल्टमॅन यांना पदावरुन बरखास्त केलं होतं. त्यांच्यावर संचालक मंडळाशी सुसंवाद न ठेवल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळेच काम करणे कठीण जात असल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे. त्या निर्णयानंतर Open AI चे सहसंस्थापक आणि अध्यक्ष ग्रेग ब्रॉकमॅन यांनीही राजीनामा सोपविला. ऑल्टमॅनवरील कारवाईनंतर काही तासांतच अन्य तीन वरिष्ठांनी आपला राजीनामा सोपवला.
 
OpenAI चे रिसर्चर जॅकब पचॉकी, एलेग्झांडर मॅड्री आणि सिजमन सिदोर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान कंपनीने शुक्रवारीच एका निवेदनात म्हटले आहे की, ‘‘Open AIचे नेतृत्व करण्याच्या क्षमतेवर आता संचालक मंडळाला विश्वास नाही." Open AI च्या मुख्य तंत्रज्ञान अधिकारी मीरा मुरातींना तत्काळ CEO पदावर नियुक्त केले आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
पवई तलावाच्‍या पर्यावरणीय व जैव विविधिता संवर्धनासाठी मलजल वाहिन्‍या अन्‍यत्र वळविणे हाच कायमस्‍वरूपी तोडगा तलावातील जलपर्णी काढण्‍याकामी तात्‍काळ ५ संयंत्रे, अधिक मनुष्‍यबळाचा वापर करावा

पवई तलावाच्‍या पर्यावरणीय व जैव विविधिता संवर्धनासाठी मलजल वाहिन्‍या अन्‍यत्र वळविणे हाच कायमस्‍वरूपी तोडगा तलावातील जलपर्णी काढण्‍याकामी तात्‍काळ ५ संयंत्रे, अधिक मनुष्‍यबळाचा वापर करावा

पवई तलावाच्‍या पर्यावरणीय व जैव विविधता संवर्धनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्‍यात येत आहेत. या अंतर्गत जलपर्णी, तरंगत्‍या वनस्‍पती काढण्‍याची कार्यवाही वेगाने करण्‍यात येत आहे. मात्र, तलावात मलजल मिसळत असल्‍याने जलपर्णी अधिक वेगाने फोफावत आहे. त्‍यासाठी पवई तलावात सांडपाणी येण्यापासून अटकाव करुन त्या वाहिन्या अन्यत्र वळविणे, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणे या दोन कामांच्‍या स्‍वतंत्र निविदा प्रक्रिया अंतिम टप्‍प्‍यात आहे. पवई तलावाच्‍या नैसर्गिक समृद्धी वाढीसाठी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121