ज्या पतीसोबत आयुष्यभर राहायचे नाही त्याच्यासाठी उपवास करण्याचा काय फायदा? - ट्विंकल खन्ना

    02-Nov-2023
Total Views |

Twinkle Khanna


मुंबई :
नुकताच करवा चौथ हा सण पार पडला. या सणामध्ये स्त्रिया आपल्या पतीसाठी दिवसभर उपवास करतात आणि रात्री चंद्राची पुजा करुन तो सोडतात. अनेक स्त्रिया अतिशय उत्साहाने आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हा सण साजरा करत असतात.
 
परंतू, काही बॉलीवूड अभिनेत्रींनी या सणावर टीका केली होती. त्यामुळे त्यांना प्रचंड ट्रोलही करण्यात आले होते. अभिनेता अक्षय कुमारची पत्नी अभिनेत्री ट्विंकल खन्ना हिनेसुद्धा एकदा करवा चौथ सणावर टीका केली होती. याबद्दल ट्विंकल खन्नाने सोशल मीडियावर पोस्ट केली होती.
 
"आजकाल ४० वर्षांचे झाल्यानंतरही लोक दुसरे लग्न करतात. त्यामुळे ज्या पतीसोबत आयुष्यभर राहायचेच नाही त्याच्यासाठी उपवास करुन काय फायदा?" असे तिने आपल्या पोस्टमध्ये लिहिले होते. या वक्तव्यावरून ती प्रचंड ट्रोल झाली होती.