राज्य सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगेंची भेट घेणार!

    02-Nov-2023
Total Views |

Manoj Jarange

मुंबई :
मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राज्य सरकारचे शिष्टमंडळ गुरुवारी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत. अंतरवाली सराटी गावामध्ये जाऊन ते मनोज जरांगेंची भेट घेणार आहेत. या शिष्टमंडळात अतुल सावे आणि उदय सामंत यांचाही समावेश आहे.
 
२ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता हे शिष्टमंडळ रवाना होणार आहे. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावे आणि सरकारला वेळ द्यावा अशी विनंती या शिष्टमंडळाकडून करण्यात येणार आहे. या शिष्टमंडळात एक निवृत्त न्यायमुर्ती, दोन मंत्री आणि काही आमदार आहेत.
 
हे शिष्टमंडळ दुपारी १ वाजता मुंबई विमानतळावरुन रवाना होणार आहे. मनोज जरांगे पाटील यांना उपोषण मागे घेण्याची विनंती या शिष्टमंडळाकडून करण्यात येणार आहे. दरम्यान, या भेटीनंतर मनोज जरांगे पाटील उपोषण मागे घेतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दुसरीकडे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे गुरुवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेणार आहेत. यावेळी ते मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर गृहमंत्री अमित शाहांची चर्चा करणार आहेत.