जावेदमियाँचे गाझाप्रेम

    02-Nov-2023   
Total Views |
Javed Akhtar
 
"गाझाचे लोक असाहाय्य असून, इस्रायल मानवताविरोधी आहे,” अशा आशयाचे ट्विट नुकतेच जावेद अख्तर यांनी केले. यावर एक व्यक्ती म्हणाली की, “गाझाचे लोक निर्दोष नसून दहशतवादी समर्थक आणि आश्रयदाते आहेत.” गाझाच्या दहशतवादाचे समर्थन केले नाही, म्हणून मग अख्तर यांनी त्या व्यक्तीला ‘दयनीय कट्टरतावादी’ असे उल्लेखिले. पण, मग जेव्हा ‘हमास’ने इस्रायलवर हल्ला केला, तेव्हा अख्तर यांना मानवतावाद आठवला का? ‘पाखंडी अख्तर’ असे म्हणत, यावरून नेटकर्‍यांनी अख्तर यांच्यावर टीकेचा भडीमार केला. गाझासाठी रडरड करत, धमकावणार्‍यांचा गट भारतातही सक्रिय आहे. संधी मिळाली तर गाझाला जाऊ असे म्हणत, राममंदिराच्या जागी बाबरी पुन्हा बांधणे, हेच आमचे जीवित ध्येय आहे, असे म्हणणारे धर्मांधही सोशल मीडियावर सर्रास दिसतात. अर्थात, मोदींचे राज्य आहे, म्हणून थोडा तरी वचक आहे म्हणा. पण, आजूबाजूला बघितले तर काय दृश्य आहे? शस्त्रास्त्र सदृश्य वस्तूंचा वापर, संपर्क आणि दळवणळण यासंबंधित व्यवसायांमधून आपला हिंदू समाज अदृश्य झाला आहे. उदाहरणार्थ, मोबाईल, टीव्ही केबलसंदर्भातला व्यवसाय. वाहनासंदर्भात हातगाडीपासून ते रिक्षा ते टॅक्सी ते अगदी स्वतंत्र वाहतूक क्षेत्र असू दे, तिथेही हिंदू समाजाच्या व्यक्ती फारशा काम करताना दिसत नाही. मोटर दुरुस्ती, गॅरेज, गवंडी, इलेक्ट्रिशियन आणि प्लंबर यांच्याकडील अवजारांचा उपयोग शस्त्रासारखाही होऊ शकतो. ही काम सध्या कोण करत आहेत? शहरातील भंगाराच्या दुकानामध्ये भंगाराच्या नावाखाली काय-काय असेल? याची नोंद कुणाकडे असते का? ही भंगार दुकानं कोण चालवतो? सर्वत्र प्रत्येक चौकात मोठे आणि छोटी-छोटी, चार ते पाच कॅटरर्स असतात. मांस व्रिकीची दुकान असतात. या सर्व कॅटरर्सकडे आणि मांस विक्रेत्यांकडे भाजी कापण्यासाठी आणि मटण, चिकन मांस कापण्यासाठी छोट्या सुरी ते काट्यापासून मोठे-मोठे सुरे असतात. कोयती आणि विळी, मोठमोठे गॅस सिलिंडरही असतात. ही दुकाने आणि कॅटरर्स कुणाची असतात? या दुकानात गिर्‍हाईकांचा राबताही नसतो. नुकसान सहन करून, ही दुकान का चालवली जात असतील? वर उल्लेख केलेल्या व्यवसायांमध्ये हिंदूंचा सहभाग नगण्य. आता कुणी म्हणेल की, कष्टकरी लोक कष्ट करून खातात, हिंदू हे काम करत नाहीत, यात या लोकांची चूक काय? पण, तरीही सुरक्षित वस्त्यांबाबत विचार करताना, या बाबींकडे दुर्लक्ष करुन चालणार नाहीच!

मै हू आदत से मजबूर...

 
मम्मा, ते हिंमता बिस्वा सरमा म्हणाले की, ”शरद पवार त्यांच्या लेकीला ‘हमास’च्यावतीने गाझामध्ये लढायला पाठवणार आहेत.” खरंय का गं? मम्मा, आपण तर आपल्या बैठकीत पॅलेस्टाईनला समर्थन दिलेच होते. आता मोदींना म्हणावं, बघा आम्ही कशी एकगठ्ठा मत घेतो ते. पण, या हिंमता यांनी असे का म्हटले? ओ हो! तिकडे महाराष्ट्रात शरद पवारांनी पॅलेस्टाईनला समर्थन केले म्हणून? इस्रायल कसा दोषी आहे, हे त्यांनी सांगितलंना? बघ ते शरद पवार ना नेहमीच आपल्याशी स्पर्धा करतात. आपण म्हटलो की, आपण पॅलेस्टाईनसोबत आहोत, तर त्यांना काय गरज होती, हे म्हणायची? मागे तुला विदेशी ठरवून आपली माणसं फोडली. नवा पक्षा बनवला आणि परत आपल्याच सोबत आले. वर स्वतःला ‘भावी पंतप्रधान’ समजातात. मागे पृथ्वी अंकलच्या हाताला लकवा मारला, असेदेखील म्हणाले होते.मम्मी, खरंच का गं सुप्रिया जाणार आहेत गाझाला! जातील ही ते. सत्ता मिळवण्यासाठी काहीही करतील आणि करायला लावतात ना? अगं असं महाराष्ट्रातील लोक बोलतात ना? मम्मा, हे बघ कोण तरी म्हणते की, हिंमता यांनी शरद पवारांना तो शाब्दिक टोला लगावला होता. ओहो! नशीब माझे. नाहीतर मग मलाही गाझाला जाण्याचा विचार करावा लागला असता. असे पॅलेस्टाईन गाझाबिझा बोललो की, आपले मतदार खुश होतात. ते मोठे-मोठे डोळे करून मोठ्या आवाजात ओरडून बोलणारे ते कोण बरं हा, ते मुंब्र्याचे आव्हाड पण ‘सेव्ह गाझा’ म्हणत टी-शर्ट घालून फिरायचे ना? बघ त्या जोरावर ते तिथून अनेकवेळा जिंकून येतात. आपण काय करायचं? कर्नाटकातल्या आपल्या मतदारांनी खुश व्हावं म्हणून आपण बुरखाबंदी हटवली, अभ्यासक्रमात मुघल आणि टिपू महाराजांचा इतिहास असलाच पाहिजे, हा निर्णय घेतला, ही कल्पना तर आपल्याला प. बंगालच्या ममता आंटीकडून मिळाली. आता काय म्हणत होतो की, तेलंगणमध्ये निवडणुका आहेत. तिथे काय केले म्हणजे आपले मतदार खुश होतील गं? तिथे हिंदू, मुस्लीम की ख्रिस्ती यांपैकी कुणाला भुलवायचे आहे? नाही म्हणजे त्याप्रमाणे वेशभुषा आणि पूजापद्धती करायला हवी ना? काय म्हणता, ही सगळी नाटकं बंद करू? जनतेला माहिती आहे, खरे काय ते? पण, तरीही मी करणार? मला केलेच पाहिजे! ‘क्या करू मैं हू आदत से मजबूर!’



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.