Cognizant Q3 चा आर्थिक निकाल जाहीर. निव्वळ नफा ५२.५ कोटी डॉलरपर्यंत खाली
नवी दिल्ली: प्रसिद्ध आयटी अमेरिकास्थित कंपनी Cognizant चा तिमाही निकाल जाहीर झाला आहे. त्यानुसार तिसऱ्या सप्टेंबर अखेर तिमाहीत कंपनीला निव्वळ नफा १६.५ टक्यांनी कमी होऊन ५२.५ कोटी डॉलरपर्यंत खाली आला आहे. मागील वर्षी निव्वळ नफा ६२.९ कोटी डॉलरचा निव्वळ नफा कंपनीला झाला होता. कंपनीची मार्जिनल ग्रोथ ०.८ टक्यांनी वाढली असली तरी उत्पन्न ०.२ टक्यांने घटले आहे.
कंपनीच्यावतीने, २०२३ मध्ये शेअर बायबॅकचे प्रमाणे १ अब्ज डॉलर पर्यंत वाढेल असा अंदाज व्यक्त केला गेला आहे.