‘सनटेक क्रिसेंट पार्क’च्या शुभारंभाची घोषणा

कल्याणच्या स्कायलाईनची नवी व्याख्या रचण्यासाठी सज्ज

    02-Nov-2023
Total Views |

Suntech 
 
‘सनटेक क्रिसेंट पार्क’च्या शुभारंभाची घोषणा

कल्याणच्या स्कायलाईनची नवी व्याख्या रचण्यासाठी सज्ज

मुंबई: सनटेक रियल्टी या प्रीमियम लक्झरी रियल इस्टेट डेव्हलपरने ‘सनटेक क्रिसेंट पार्क’चा शुभारंभ करत असल्याची घोषणा केली आहे. हा फ्यूचरिस्टिक, वेगवेगळ्या प्रकारे वापरला जाईल असा प्रकल्प कल्याणमध्ये अतिशय मोक्याच्या ठिकाणी उभारला जात आहे. कल्याणमध्ये शहरी जीवनाची नवी व्याख्या रचण्यासाठी सज्ज झालेल्या सनटेक रियल्टीचा हा नवा प्रकल्प म्हणजे लक्झरी, सुविधा आणि आधुनिक डिझाईन यांचा सामंजस्यपूर्ण मिलाप आहे. हा प्रकल्प सामान्य प्रकल्पांपेक्षा वेगळा आणि अनोखा आहे.
 
वास्तुकलेच्या भव्यतेचे प्रतीक असलेला ‘सनटेक क्रिसेंट पार्क’ (फेज १) प्रकल्प त्यातील राजेशाही टॉवर्ससह ७ एकरांवर वसलेला आहे. तब्बल १.४ एकरांच्या ओपन-टू-स्काय पोडियमसह ८०% खुल्या जागांचे ३६० डिग्री पॅनोरॅमिक विस्टा दर्शन,आश्चर्यचकित करणारा जमिनीपासून ५५ फीट वर असलेला इन्फिनिटी पूल आणि इतर अनेक सुविधांचा यामध्ये समावेश असणार आहे. कल्याणमध्ये एक नवी सुरुवात करत असलेल्या या प्रकल्पात आरामदायी, लक्झरियस घरे, आरोग्य आणि कल्याण यासाठी हितकारक सुविधा, रिटेल प्लाझा आणि फाईन डायनिंग यांचा लक्षणीय संगम आहे जो अतुलनीय जगण्याचा अनुभव मिळवून देतो.
 
‘सनटेक क्रिसेंट पार्क’मध्ये विविध गरजा पूर्ण करणाऱ्या आणि अनोखे अनुभव मिळवून देणाऱ्या आधुनिक सुविधा डिझाईन करण्यात आल्या आहेत. या शानदार प्रकल्पात ग्रीन बिल्डिंग वैशिष्ट्यांमुळे पर्यावरणपूरकतेचे देखील समर्थन करण्यात आले आहे. सौर ऊर्जा निर्मितीपासून कचऱ्याच्या रिसायकलिंगपर्यंत अनेक बाबतीत हा प्रकल्प आपल्या पॅसिव्ह डिझाईन धोरणांमार्फत ऊर्जा सक्षमतेला प्रोत्साहन देतो, निसर्गाशी समन्वय साधतो आणि कार्बन फूटप्रिंट कमी करतो.
 
‘सनटेक क्रिसेंट पार्क’सह सनटेक रियल्टी कल्याणचा कायापालट करून त्याठिकाणी प्रीमियर रेसिडेन्शियल हेवन निर्माण करत आहे. सनटेक रियल्टीचे चेयरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर श्री कमल खेतान यांनी सांगितले, " सनटेक क्रिसेंट पार्क हा एक भव्य, विविध प्रकारे उपयोग करता येईल असा प्रकल्प आहे. जो कल्याणमध्ये हाय एंड लिव्हिंगची परिभाषा बदलेल. या प्रकल्पासह आम्ही बृहन्मुंबई महानगर प्रदेशाच्या पूर्व उपनगरामध्ये पदार्पण करत आहोत "
 
पुढील ७-८ वर्षांमधील कल्याणमध्ये सनटेक रियल्टीकडून केल्या जाणार असलेल्या सर्व विकासातून जवळपास ९००० कोटी रुपये महसूल उभारला जाईल, ज्यामुळे एमएमआरमधील कंपनीचे स्थान अधिक बळकट होईल.