मुंबई : जगातील सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष सध्या १९ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या भारत- ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या विश्वचषक अंतिम सामन्याकडे लागले आहे. एकदिवसीय विश्वचषक सामन्यात भारत-ऑस्ट्रेलियाचा सामना अहमदाबाद येथे रंगणार असून स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी हा सामना पाहण्यासाठी हजर राहणार आहेत. १५ नोव्हेंबर रोजी झालेल्या उपांत्य फेरीसाठी भारताला प्रोत्साहन देण्यासाठी कलाकारांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. यात दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत देखील होते. आता रजनीकांत यांनी १९ नोव्हेंबरला होणाऱ्या अंतिम सामन्याची भविष्यवाणी केली आहे.
रजनीकांत म्हणाले की, “उपांत्य फेरीच्या सुरुवातीला मला भीती वाटत होती. मात्र, नंतर विकेट पडत राहिल्या आणि सगळं सुरळीत झालं. त्या दीड तासात मी खूप घाबरलो होतो, पण मला १००% खात्री आहे की विश्वचषक भारताचाच आहे.
रजनीकांत यांच्या चित्रपटांविषय बोलायचे झाल्यास सुपरस्टार रजनीकांत यांचा आगामी चित्रपट ‘थलायवर १७०’ हा असणार असून यात अमिताभ बच्चन आणि रजनीकांत ३० वर्षांनी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत.