मुंबई : मध्य रेल्वेने ऑटोमोबाईल लोडिंगमध्ये या आर्थिक वर्षात प्रभावी कामगिरी केली आहे. मध्य रेल्वे दि. १ एप्रिल ते १५ नोव्हेंबर २०२३ पर्यंतच्या मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ३६ टक्के अधिक ऑटोमोबाईल्सच्या वाहतुकीचा टप्पा पार करत आहे.
मध्य रेल्वेने दि. १ एप्रिल ते दि. १५ नोव्हेंबर या कालावधीत ७०८ रेकमध्ये १,०१,४४३ ऑटोमोबाईल्स लोड केले आणि रु.१२०.१८ कोटी रुपयांचा महसूल गोळा केला आहे. मागील आर्थिक वर्ष २०२२-२३ याच कालावधीतील ६१३ रेकमध्ये लोड केलेल्या ७४१६८ ऑटोमोबाईल लोडिंगपेक्षा ३६ टक्के अधिक आहे ज्यामधून ९४.१९ कोटी रुपये महसूल प्राप्त झाला आहे.
मुंबई विभागातील कळंबोली, नागपूर विभागातील अजनी, भुसावळ विभागातील नाशिकरोड, सोलापूर विभागातील दौंड आणि विलाड आणि पुणे विभागातील खडकी, चिंचवड, मिरज आणि लोणी येथे वाहतुकीसाठी मोटारींचे लोडिंग करण्यात आले.
- पुणे विभाग : ४९१ रेकमध्ये ७९,१३६ मोटारगाड्या लोड
- भुसावळ विभाग : १८३ रेकमध्ये १८,२२४ मोटारगाड्या लोड
- सोलापूर विभाग : २२ रेकमध्ये २,५८० मोटारगाड्या लोड
- नागपूर विभाग : ८ रेकमध्ये १,२०३ मोटारगाड्या लोड
- मुंबई विभाग : ४ रेकमध्ये ३०० मोटारगाड्या लोड