बाळासाहेब असते तर त्यांनी पंतप्रधान मोदींचं कौतुक केलं असतं: मुख्यमंत्री
17-Nov-2023
Total Views |
मुंबई : अयोध्येत राममंदिर २०२४ साली पूर्णत्वास येणार आहे. बाळासाहेबांच्या जन्मदिवसाच्या पूर्वसंध्येला हा योग जुळून येत आहे. बाळासाहेब असते तर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं असतं. असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. यावेळी बोलताना शिंदेंनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर घडलेल्या घटनेवरही निषेध व्यक्त केला आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले, "राम मंदिर हेही बाळासाहेबांचं स्वप्न होतं. आज बाळासाहेबांचा ११वा स्मृतिदिन आहे. बाळासाहेबांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करतो. बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललोय. ठाकरे गटाकडून गालबोट लावण्याचा प्रयत्न झाला. काल झालेला प्रकार निंदनीय आहे. वाद होऊ नये म्हणून मी कालच दर्शन घेतलं. काल झालेला प्रकार दुर्दैवी आणि निंदनीय होता. ठाकरे गटाने बाळासाहेबांचे विचार सोडलेत. मुख्यमंत्री म्हणुन मी आजही स्मृतीस्थळी जाऊ शकत होतो."असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.