केंद्र सरकारकडून ठाणेकरांना २५ रुपये दरात कांदाविक्री

भाजपच्या पुढाकाराने स्वस्त कांदा घरोघरी

    17-Nov-2023
Total Views | 34
BJP Initiative in Thane City Cheap Price Onion

ठाणे :
अचानक झालेल्या पावसामुळे कांद्याचे भाव वाढल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून सामान्य ग्राहकांना दिलासा देण्यासाठी ठाण्यात २५ रुपये किलो दराने कांद्याची विक्री करण्यात येत आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी सामान्यांपर्यंत कांदा पोचविण्यासाठी पुढाकार घेतला असून, ठिकठिकाणी कांदा विक्री सुरू आहे. त्याला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

राज्यातील कांदा उत्पादक क्षेत्रात अचानक झालेल्या पावसामुळे कांद्याचे नुकसान झाले. त्यामुळे कांद्याचे भाव किरकोळ बाजारात ८० रुपयांपर्यंत पोचले होते. त्यामुळे जनसामान्यांचे बजेट कोलमडले. या ग्राहकांना दिलासा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या एनसीसीएफ, नाफेड यांच्या माध्यमातून २५ रुपये दराने कांदे विक्री करण्यात येत आहे. ठाण्यातील ग्राहकांपर्यंत कांदा पोचविण्यासाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी पुढाकार घेतला आहे.

त्यानुसार भाजपचे आ. संजय केळकर व आ. निरंजन डावखरे यांच्या हस्ते योजनेचा शुभारंभ झाला. नौपाड्यातील यश आनंद सोसायटीतील कुटुंबांना कांद्यांची विक्री करण्यात आली. त्यानंतर गावदेवी मैदानानजीकच्या न्यू प्रभातनगर परिसरात सामान्यांना स्वस्तात कांदे विक्री झाली. गोकुळनगरमधील माजी नगरसेवक कृष्णा पाटील व नंदा पाटील यांच्या कार्यालयाबाहेर आणि माजी नगरसेविका नम्रता कोळी व जिल्हा उपाध्यक्ष जयेंद्र कोळी यांच्या सहकार्याने खारटन रोड परिसरात कांदे विक्रीला सुरुवात करण्यात आली.

या वेळी माजी नगरसेवक सुनेश जोशी, भाजपाचे सरचिटणीस सचिन पाटील, उपाध्यक्ष विक्रम भोईर, डॉ. राजेश मढवी, मंडल अध्यक्ष दया यादव, सचिन केदारी, प्रशांत कळंबटे, मनोज शुक्ला, हिमांशू राजपूत, अजय सिंह, वृषाली वाघुले-भोसले, दिलीप कंकाळे आदींसह स्थानिक नागरिक व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
अग्रलेख
जरुर वाचा
गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याच्या भुयारी कामाला वेग राष्ट्रीय उद्यानातील वन खात्‍याची १९.४३ हेक्‍टर जागा बीएमसीकडे वळती - केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता

गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याच्या भुयारी कामाला वेग राष्ट्रीय उद्यानातील वन खात्‍याची १९.४३ हेक्‍टर जागा बीएमसीकडे वळती - केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता

मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता प्रकल्प (तिसरा टप्पा) अंतर्गत बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या जुळ्या बोगद्याच्या बांधणीला आता गती मिळणार आहे. प्रत्येकी ४.७ किलोमीटर अंतराच्या आणि ४५.७० मीटर रुंदीच्‍या जुळ्या बोगद्यासाठी आवश्‍यक असलेली १९.४३ हेक्‍टर वनजमीन बृहन्‍मुंबई महानगरपालिकेकडे वळती करण्‍यास केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता मिळाली आहे. त्‍यानुसार, अटी व शर्तींचे अनुपालन तसेच पूर्ततेची ..

राज्यातील १८ हजार शाळांमध्ये पटसंख्या २० पेक्षा कमी

राज्यातील १८ हजार शाळांमध्ये पटसंख्या २० पेक्षा कमी

१ हजार ६५० गावांमध्ये प्राथमिक, तर ६ हजार ५५३ गावांमध्ये उच्च प्राथमिक शाळा नाहीत राज्यातील एक लाखांहून अधिक शाळांपैकी सुमारे १८ हजार शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या २० पेक्षा कमी आहे. तर १ हजार ६५० गावांत प्राथमिक आणि ६ हजार ५५३ गावांत उच्च प्राथमिक शाळा उपलब्ध नाहीत. विद्यार्थी संख्येत घट झाली असली, तरी त्या शाळा सुरूच राहतील आणि त्या ठिकाणी शिक्षणात अडथळा येणार नाही, याची संपूर्ण काळजी घेतली जाईल. ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे, तेथे अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात येत असल्याची माहिती ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121