'पुष्पा'च्या यशानंतर श्रेयसच्या नव्या चित्रपटाची घोषणा, कर्नाटकाच्या माजी मुख्यमंत्र्यांची पत्नी झळकणार प्रमुख भूमिकेत

    15-Nov-2023
Total Views |

shreyas talpade 
 
मुंबई : अभिनय आणि निर्मीती क्षेत्रात आपली ओळख निर्माण करणारा श्रेयस तळपदे पुन्हा एकदा मराठीकडे वळला आहे. दाक्षिणात्य चित्रपट 'पुष्पा' या चित्रपटात अल्लू अर्जूनसाठी हिंदीत आवाज देत श्रेयसने मराठी आणि हिंदी पाठोपाठ दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत देखील आपली छाप सोडली. श्रेयसने मराठी-हिंदीबरोबरच दाक्षिणात्य सिनेसृष्टीतही त्याची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. आता लवकरच तो एका बिग बजेट दाक्षिणात्य चित्रपटात झळकणार आहे.
 
श्रेयस तळपदे हा पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला असून ‘अजाग्रत’ या त्याच्या आगामी पॅन इंडिया चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटात श्रेयस तळपदे हा प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. त्याच्याबरोबर या चित्रपटात कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री यांची पत्नी आणि कन्नडची अभिनेत्री राधिका कुमारस्वामी प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. या व्यतिरिक्त 'अजाग्रत'मध्ये सुनील, राव रमेश, जगपती बाबू, आदिथ्य मेनन, देवराज, अच्युत कुमार, साई कुमार, समुद्र कानी, मोहन लाल यांच्यासह अन्य कलाकार आहेत.
 

ajagrat 
 
'अंधारामागील सावल्या' अशी या चित्रपटाची टॅगलाईन असून या कथानक अनपेक्षिरित्या उलगडणार आहे. दरम्यान, या चित्रपटाच्या माध्यमातून शशिधर बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. रवी राज यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. वाढदिवसाचे औचित्य साधून 'अजाग्रत'च्या राधिका कुमारस्वामी यांच्या व्यक्तिरेखेच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. हा चित्रपट हिंदीसह सात विविध भाषेत प्रदर्शित होणार आहे.
 
'अजाग्रत' हा एक ॲक्शन थ्रिलर असून यात श्रेयस तळपदेसोबत अजून एक बॉलिवूड अभिनेता झळकणार आहे. या अभिनेत्याची ओळख लवकरच समोर येणार आहे, ज्यामुळे चित्रपटाची उत्सुकता वाढेल. हा चित्रपट श्रेयस तळपदेसाठी खास असणार आहे. सात वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रदर्शित होणारा त्याचा हा श्रेयसचा पहिला पॅन इंडिया चित्रपट असणार आहे.