महाविकास आघाडीचे जागावाटप निश्चित! चार जागांचा तिढा सुटेना!
15-Nov-2023
Total Views |
मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे जागावाटप अंतिम टप्प्यात आले आहे. ४४ जागांची बोलणी जवळपास पुर्ण झालेली आहे. तसेच मात्र चार जागांवर चर्चेतून निर्णय होणार आहे. दरम्यान अकोला , हातकणंगले जागा महाविकास आघाडीने राखीव ठेवली. त्यात जर वंचित बहुजन आघाडी मविआसोबत आली तर अकोला जागा वंचितला दिली जाऊ शकते. अन्यथा ही जागा काँग्रेसला दिली जाणार आहे.
दरम्यान या जागावाटपात ठाकरे गटाच्या वाट्याला सर्वाधिक जागा आल्या आहेत. तर जागा वाटपात काँग्रेस आणि राष्ट्रवादी अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. तसेच वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांसाठी आणि राजू शेट्टी यांच्यासाठी ही जागा सोडण्यात आल्या आहेत.
दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकरे गटाला १९-२१ , काँग्रेसला १३ ते १५ आणि शरद पवार गटाला १० ते ११ जागा जागा सोडण्यात येणार आहेत. त्यात दोन जागा प्रकाश आंबेडकर आणि राजू शेट्टी यांच्यासाठी सोडण्यात आल्या आहेत. तर चार जागांचा तिढा कायम असून हा तिढा चर्चेतून सोडवला जाणार असल्याचे सांगितले जात आहेत.