चार वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार करणारा पोलिस अखेर जेरबंद!

    12-Nov-2023
Total Views |

Rajasthan


जयपूर :
राजस्थानमधील दौसा जिल्ह्यात चार वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करणारा पोलिस भुपेंद्र सिंहला अखेर अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आहे. तसेच त्याला पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.
 
राहुवास पोलिस ठाण्यामध्ये असलेला पोलिस उपनिरीक्षक भुपेंद्र सिंह हा भाड्याच्या खोलीत राहत होता. शुक्रवार १० नोव्हेंबर रोजी एक चार वर्षाची चिमुकली तिथे खेळत असताना त्याची नजर तिच्यावर पडली. त्याने तिला आपल्या खोलीत बोलवत तिच्यावर बलात्कार केला.
 
पीडित मुलीच्या कुटुंबियांना या घटनेची माहिती मिळताच संपुर्ण परिसरात एकच गोंधळ उडाला होता. नागरिकांनी पोलिस ठाण्यात गर्दी करत आरोपी पोलिसाच्या अटकेची मागणी केल्याने त्याच दिवशी आरोपीला ताब्यात घेण्यात आले होते.
 
दरम्यान, आता भुपेंद्र सिंहवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. तसेच त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे. याप्रकरणी माजी मुख्यमंत्री वंसुधरा राजे यांनी यावरून राजस्थान सरकारवर निशाना साधला आहे.