मुंब्रा शाखेचा वाद आता कोर्टात; शाखा कोणाची हा वाद आता कोर्टात मिटणार?

    12-Nov-2023
Total Views |
 ubhata group
 
मुंबई : मुंब्र्यातील शिवसेनेच्या शाखेचा वाद आता न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. मुंब्र्यातील शाखेवरुन उबाठा गट शिवसेनेच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची शक्यता आहे. कागदपत्रांची तपासणी करुन उबाठा गट न्यायालयात जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.
 
काल उद्धव ठाकरेंनी मुंब्र्यात शाखेच्या ठिकाणी भेट दिली. त्यावेळी त्यांनी भाषण सुद्धा केले. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. त्यासोबतच निवडणूका घेण्याचे सुद्धा आव्हान दिले आहे. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या टिकेला उत्तर दिले. ते म्हणाले की, "मुंब्र्यात आलेले फुसके बार बिना वाजताच निघून गेले."
 
मुंब्र्यातील सभेला जितेंद्र आव्हाड आणि त्यांचे कार्यकर्ते सुद्धा उपस्थित होते. त्यांनी उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी लावलेले बॅनर सुद्धा शिवसेना कार्यकर्त्यांनी फाडले होते. त्यामुळे उबाठा गटात आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पण उद्धव ठाकरेंच्या सभेनंतर आता वातावरण शांत झाले आहे.