बांग्लादेशमध्ये हिंदूंविरुद्ध लँड जिहाद! कट्टरपंथीयांकडून हिंदूंच्या घरावर कब्जा करत मंदिरांची तोडफोड
11-Nov-2023
Total Views |
मुंबई : बांग्लादेशमध्ये हिंदू समुदायातील लोकांचा कट्टरपंथीयांकडून छळ होत असल्याने त्यांना आपले घर सोडून स्थलांतर करावे लागत आहे. येथील कट्टरपंथीयांकडून होणाऱ्या हिंदू समाजातील महिलांवरील बलात्कार आणि त्यांच्या हत्येमुळे लँड जिहादसारख्या घटना घडत आहे.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बांग्लादेशात हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्यांचे प्रमाणही वाढले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बांग्लादेशमध्ये अल्पसंख्यांक हिंदू समुदायाला कट्टरपंथीयांकडून धोका असल्याने अनेक हिंदू कुटुंब देशातील इतर भागांमध्ये स्थलांतर करत आहेत.
शैलकुपा जिल्ह्यात काही कट्टरपंथीयांनी एका हिंदू व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे घर बळकावले आहे. तसेच त्या जागी त्यांनी आपली चार मजली इमारतही बांधली आहे. शैलकुपा येथील हिंदू रहिवाशांच्या घरी तोडफोड करण्यासह त्यांना विविध प्रकारे धमकावून त्यांची घरे विकण्यास भाग पाडण्यात येत आहे.
दरम्यान, सोमवार, ६ नोव्हेंबर रोजी काही इस्लामिक कट्टरपंथीयांनी शैलकुपा जिल्ह्यातील बिजुलिया या गावात एका मंदिराची विटंबना करत तेथील मुर्तींची तोडफोडही केली. गेल्या काही वर्षात बांगलादेशात हिंदूंवर हल्ले वाढले आहेत. यासोबतच हिंदू महिलांचे अपहरण करणे, त्यांच्यावर बलात्कार करणे यारसाख्या घटनाही वाढल्या आहेत.