मुंबई : 'दि. मुंबई डिस्ट्रिक्ट को ऑपरेटिव्ह फेडरेशन'च्या वतीने विक्रोळीत शिक्षण प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. ही वास्तू विधानपरिषदेतील भाजप गटनेते प्रवीण दरेकर यांच्या निधीतून उभारण्यात येणार आहे. या इमारतीचे भूमीपूजन दि. १२ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक यांच्या हस्ते विक्रोळी पूर्वेत इमारत क्र. ७७ शेजारी, कन्नमवारनगर-२ जुन्या पोलीस स्टेशन शेजारी होणार आहे.
या कार्यक्रमाला विधानपरिषदेतील भाजप गटनेते , मुंबई जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष आ. प्रवीण दरेकर, उपाध्यक्ष सिद्घार्थ कांबळे, मुंबई हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर, मुंबई जिल्हा सहकारी बँकेचे संचालक आमदार प्रसाद लाड, आमदार सुनील राऊत, ज्येष्ठ सहकार नेते शिवाजीराव नलावडे, बँकेचे संचालक नंदकुमार काटकर, अॅड. डी. एस. वडेर, डी.एन. महाजन, वसंतराव शिंदे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.तसेच पूर्व उपनगर परिसरातील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मुंबई हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर यांनी केले आहे.