स्पेनमध्येसुद्धा दहशतवाद पसवण्यात पाकिस्तान्यांचा हात! पोलिसांनी केला कट्टरपंथीयांचा पर्दाफाश

    10-Nov-2023
Total Views |

Pakistani terrorists


मुंबई :
स्पेन पोलिसांनी दहशतवादविरोधी कारवाईमध्ये १४ पाकिस्तानी दहशतवाद्यांना अटक केली आहे. सध्या या सर्वांची चौकशी सुरु असून लवकरच त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. स्पेनमध्ये हे सर्व दहशतवादी मोठे जिहादी नेटवर्क चालवत असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व पाकिस्तानी दहशतवादी तहरीक-ए-लब्बैकशी संबंधित आहेत. या संघटनेकडून पाकिस्तानमध्ये शरिया कायदा लागू करण्याची मागणी करण्यात येत आहे.. अलीकडच्या काळात या संघटनेकडून अनेक हिंसक निदर्शनेही करण्यात आली आहेत.
 
तसेच अटक करण्यात आलेले पाकिस्तानी दहशतवादी कॅटालोनिया, व्हॅलेन्सिया, लोग्रोनो आणि व्हिटोरिया या स्पॅनिश राज्यांमध्ये राहतात. त्यांनी एक नेटवर्क तयार केले असून त्याद्वारे ते कट्टरपंथी विचारधारा पसरवण्याचे काम करतात.
 
हमासच्या हल्ल्यानंतर स्पेनसह अनेक युरोपीय देशांमध्ये दहशतवादी धोका लक्षात घेता सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. याद्वारे जिहादींवर कारवाई करण्यात येत आहे. यासोबतच हे पाकिस्तानी दहशतवादी धर्मांतराचे रॅकेटही चालवत असल्याची माहिती पुढे आली आहे.