Protean eGov Technologies Limited चा आयपीओ जाहीर. प्राईज बँड हा ७५२ ते ७९२ रूपये प्रति रूपये
६१९१००० रूपयांचे इक्विटी शेअर विक्रीसाठी खुले. बिडींगसाठी किमान १८ इक्विटी शेअर खरेदी आवश्यक
४५९,६१७ रूपयांचे शेअर (भागभांडवल) हे ऑफर फॉर सेल
पूर्वाश्रमीच्या NSDL व आताची Protean eGov Technologies Limited ही भारतातील डिजिटल टेक्नॉलॉजी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी
मोहित सोमण
मुंबई: पूर्वाश्रमीच्या (एनएसडीएल ए गव्हर्नन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड) आताच्या Protean eGov Technologies Limited ने आपला IPO (Initial Public Offer) मार्केटमध्ये आणला आहे. गेले २८ वर्ष ही कंपनी टेक्नॉलॉजी इकोसिस्टीम व सरकारी प्रमाणपत्रांचे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी कार्यरत आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड अशा विविध प्रणाली या कंपनीने विकसित केल्या आहेत. गेल्या काही दिवसात अत्याधुनिक डिजिटल इकोसिस्टीम व वित्त तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी कंपनीने सरकार बरोबर काम करत आहे. ज्यामध्ये इ डेटा मॅनेजमेंट, डेटा इंटिग्रेशन व डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टसाठी Protean कंपनी काम करत असते.
कंपनी आपला आयपीओ ६ नोव्हेंबर पासून बाजारात खुला ठेवणार आहे. ६ ते ८ नोव्हेंबरपर्यंत हा आयपीओ गुंतवणूकीसाठी खुला ठेवला जाणार असून एकूण ६,१९१, ००० पर्यंत किंमतीचे इक्विटी शेअर हे उपलब्ध असणार आहेत. शेअर्सचा प्राईज बँड हा ७५२ ते ७९२ रूपये प्रति शेअर्स ठेवण्यात आला आहे. दर्शनी मूल्यापेक्षा फ्लोर किंमत ७५.२० पटीने व कॅप किंमत ७९.२० टक्यांने जास्त प्रमाणात आहे. किमान १८ शेअर खरेदी करण्याची अट या आयपीओत ठरलेली असून त्यानंतरील सबस्क्राईब बिड १८ इक्विटी शेअर्सच्या पटीत करता येणार आहे. संस्थेच्या पात्र कर्मचाऱ्यांना ७५ रूपये प्रति शेअर रूपयाची विशेष सूट दिली आहे.अँकर गुंतवणूकदार (Institutional Investors) साठी गुंतवणूकीची तारीख ही ३ नोव्हेंबर आहे.
या ६,१९१,००० मूल्यांकनापैकी ४५९,६१७ रूपयांचे शेअर (भागभांडवल) हे ऑफर फॉर सेल (Offer for sale) हे पूर्वीच्या IIFL Special Securities Fund व आताच्या 360 One Special Opportunities Fund कडून विक्रीस उपलब्ध आहेत. यातील ३२०१७७ इक्विटी शेअर 360 One Special (सिरीज २) कडून उपलब्ध असून १,४८, १९७ रूपयांचे इक्विटी शेअर हे 360 One Special Opportunities Fund (सिरीज ३) मधून उपलब्ध असतील. या ऑफरमध्ये कर्मचाऱ्यांना आरक्षण दिले गेले असून १५०००० रूपयांचे इक्विटी शेअर या पात्र कर्मचाऱ्यांना वाटप करण्यात येईल. Employee Reservation Portion या तरतूदीखाली हे वाटप होऊन ७५ रूपये प्रति इक्विटी शेअरची सूट त्यांनी मिळणार आहे.
अहवालानुसार, २०२२ मधील आर्थिक वर्षाआखेर कंपनीने 690.9 कोटींच्या महसुलावर 143.9 कोटीचा निव्वळ नफा नोंदवला आहे.मागील वर्षीच्या ६०३ कोटी रूपयांचा महसूल नोंदवला असून ९२ कोटी रूपयांच्या च्या निव्वळ नफ्यापेक्षा तुलनेने कमी नफा नोंदवला आहे.
पब्लिक डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरमधील ही कंपनी देशातील सर्वात मोठी कंपनी असून वित्त, भांडवल, कॅपिटल, आता फिनटेक अशा विविध क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. १९९५ साली या डिपॉझिटरी कंपनीची स्थापना झाली होती. २०२१ साली या कंपनीचे नाव Protean असे करण्यात आले. प्रोटियन या शब्दाचा परिस्थितीशी, नवीन बदलाशी जुळवून घेणारा असा होतो.