पाकिस्तान-बांग्लादेश सामन्यादरम्यान फडकवला पॅलेस्टिनी ध्वज! चार जणांना अटक
01-Nov-2023
Total Views |
कोलकाता : कोलकातामध्ये क्रिकेट सुरु असताना पॅलेस्टाईनचा झेंडा फडकवल्याने पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. कोलकात्याच्या ईडन गार्डन्स क्रिकेट मैदानावर पाकिस्तान आणि बांग्लादेश यांच्यात सामना सुरु असताना ही घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोलकात्याच्या ईडन गार्डन्स क्रिकेट मैदानावर पाकिस्तान आणि बांग्लादेशमध्ये विश्वचषक सामना सुरु होता. यावेळी चार जणांनी पॅलेस्टिनी ध्वज फडकवला. यापैकी दोन झारखंडमधील आहेत, तर दोन कोलकात्याच्या वेगवेगळ्या भागातील आहेत.
या लोकांना इस्रायल-हमास युद्धाकडे लोकांचे लक्ष वेधायचे होते, अशी माहिती प्राथमिक तपासात समोर आले आहे. मंगळवार ३१ ऑक्टेबर रोजी ही घटना घडली आहे. या चार जणांना पोलिस ठाण्यात नेऊन त्यांचा तपास करण्यात आला. यावेळी आरोपींना पॅलेस्टाईनच्या समस्येकडे लोकांचे लक्ष वेधायचे असल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान, या प्रकरणात काही बाहेरचा संबंध आहे का, याबाबत पोलिस तपास करत आहे.