नवी दिल्ली : '३० टक्के कमिशन द्या, पाकिस्तानी संघात जागा मिळवा', असा गौप्यस्फोट आता समोर आला आहे. तसेच, बहुतेक पाकिस्तानी क्रिकेटर्स हे पीआर कंपनीशी संबंधित होते, असादेखील खुलासा यावेळी करण्यात आला आहे. दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट संघाचे मुख्य निवडकर्ता इंझमाम उल हक याच्यासह बाबर, रिझवान आणि शाहीनही पीआर कंपनीशी संबंधित होते त्यामुळे वर्ल्डकपमध्येच नाही तर पीसीबीमध्येही तणाव असल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, मुख्य निवडकर्ता इंझमाम उल हक समितीसमोर हजर राहणार नसून तपासात निर्दोष ठरल्यास पुन्हा पदावर येईन, असे त्यांनी म्हटले आहे. तर सध्याच्या विश्वचषकात पाकिस्तान उपांत्य फेरीतून बाहेर पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे तेथील क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) यावर विचारमंथन सुरू केले आहे.
पाकिस्तानचे मुख्य निवडकर्ता इंझमाम उल हक याच्याबाबत असे समोर आले आहे की, तो एका खासगी कंपनीत काम करत असे आणि त्यानुसार त्याने संघाची निवड केली. या खुलाशानंतर त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर पीसीबीने तथ्य शोध समिती स्थापन केली. आता तपासादरम्यान, पाकिस्तानी संघातील अनेक खेळाडू या एजन्सीशी संबंधित असल्याचे बोर्डाला समोर आले आहे.