नागपूर : नागपूरात १२ वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या दोन आरोपींना अटक करण्यात आले आहे. पीडित मुलीवर बलात्कार करुन तिच्य़ा शरीरावर सिगारेटचे चटके देण्यात आले होते. या प्रकरणी आता न्यायालयाने आरोपींना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
तहा अरमान खान आणि अझहर शेख अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तहा अरमान खान आणि अझहर शेख यांनी घरकाम करणाऱ्या मुलीच्या छातीला आणि गुप्तांगाला सिगारेटचे चटके देऊन बलात्कार केला. तसेच हिना खान हिने मुलीच्या पोटाला आणि छातीला तव्याचे चटकेही दिले.
परंतु, हुडकेश्वर पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने न घेता पोलिस स्टेशनमध्ये आरोपींना व्हिआयपी वागणूक दिली. त्यामुळे पोलीस उपनिरीक्षक बाळू राठोड यांना निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर हे प्रकरण पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मानवी तस्करी विरोधी पथकाच्या प्रमुख रेखा संकपाळ यांच्याकडे सोपवले होते.
त्यांनी दोन आरोपींना मध्यवर्ती कारागृहातून ताब्यात घेत शनिवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर या दोन्ही आरोपींना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तसेच हिना खान ही फरार असून तिचा शोध सुरु आहे.