मुंबई : "नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड"अंतर्गत रिक्त जागांची भरती केली जाणार आहे. या भरतीसंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून तरुणांना नोकरीची संधी मिळणार आहे. एनटीपीसी अंतर्गत होणाऱ्या भरतीप्रक्रियेतून विविध रिक्त पदांच्या ४९५ रिक्त जागा भरण्यात येणार आहे.
एनटीपीसी अंतर्गत होणाऱ्या भरतीच्या माध्यमातून "अभियांत्रिकी कार्यकारी प्रशिक्षणार्थी" पदांच्या रिक्त जागा भरण्यात येतील. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० ऑक्टोबर २०२३ असणार आहे.
भरतीविषयक अधिक तपशील जाणून घेण्यासाठी एनटीपीसीच्या
अधिकृत वेबसाईटला भेट द्या.