मराठा आरक्षण प्रश्नावर अभ्यासासाठी न्या. संदीप शिंदे समिती मराठवाडा दौऱ्यावर
08-Oct-2023
Total Views |
मुंबई : गेले अनेक दिवस महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचे वादळ सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जालन्याच्या अंतरवली सरटी गावात आंदोलक उपोषणाला बसले होते. यावेळी सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. यावर निर्णय घेण्यासाठी सरकारने उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली समिती नेमली आहे.
गठित केलेल्या समितीचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे व समिती सदस्य हे ११ ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत छत्रपती संभाजीनगर विभागाचा जिल्हानिहाय दौरा करणार आहे. मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपद्धती विहीत करण्यासाठी या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे .
या दौऱ्यादरम्यान, समितीचे अध्यक्ष व सदस्य कामकाजाच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये बैठक घेणार आहेत. यावेळी जिल्ह्यातील नागरिकांनी त्यांच्याकडे उपलब्ध असणारे निजामकालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक पुरावे, महसूली पुरावे, निजाम काळात झालेले करार, निजामकालीन संस्थानिकांनी दिलेल्या सनदी, राष्ट्रीय दस्तावेज इ. पुरावे समितीस तपासण्याकरता द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
समितीची पहिली बैठक छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय आयुक्त कार्यालयात ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.०० वाजता होणार आहे. तर त्यानंतरच्या सर्व बैठकी प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ११.०० वाजता होणार असून त्याचे वेळापत्रक पुढिलप्रमाणे :