शक्तिशाली भूकंपामुळे अफगाण हादरलं; २ हजारांहून अधिक जणांचा मृत्यु

    08-Oct-2023
Total Views |
afghanistan-powerful-earthquake-aftershocks-kills

नवी दिल्ली :
अफगाणिस्तानमध्ये ६.३ रिश्टल स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंपचा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता इतकी भीषण होती की, यामुळे तब्बल २ हजार जणांचा मृत्यु झाला आहे. दरम्यान, या शक्तिशाली भूकंपामुळे अफगाणिस्तानातील ग्रामीण घरे उध्वस्त झाली तर भूकंपाने भयग्रस्त झाल्याने शहरातील नागरिकांनी रस्त्यावर धाव घेतली.

दरम्यान, भूकंपाच्या धक्क्यामुळे उध्वस्त झालेल्या गावांतील घरांमध्ये वाचलेल्यांना शोधण्यात येत असून यात प्रामुख्याने हेरात प्रांताच्या राजधानीच्या वायव्येस ३० किमी अंतरावरील भागांना भूकंपाचा धक्का बसला आहे. असोसिएटेड प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, देशाच्या राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाने सांगितले की, पश्चिम अफगाणिस्तानमध्ये तीव्र आफ्टरशॉक आणि त्यानंतर आलेल्या शक्तिशाली ६.३ तीव्रतेच्या भूकंपामुळे शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे.

तसेच, या भूकंपात ९ हजाराहून अधिक जण जखमी असल्याचे वृत्त आहे. तालिबान प्रशासनाने सांगितले की, भूकंपप्रवण देशाला हादरवून सोडणाऱ्या अनेक वर्षांतील सर्वात भयंकर हादऱ्यामुळे मृत्यूंची संख्या १ हजारांपेक्षा क्षा जास्त असल्याचे तालिबान प्रशासनाने एएफपीला सांगितले. तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएचओ) ने सांगितले की हेरात प्रांतातील किमान १२ गावांमध्ये ६०० हून अधिक घरे उद्ध्वस्त झाली आणि सुमारे ४,२०० लोक भूकंपामुळे प्रभावित झाले.