आज नवी दिल्लीत ५२ वी जीएसटी काऊन्सिल बैठक

अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार संपन्न

    07-Oct-2023
Total Views |

Nirmala Sitharaman
 
 
आज नवी दिल्लीत ५२ वी जीएसटी काऊन्सिल बैठक

 
अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार संपन्न
 

नवी दिल्ली: आज शनिवारी अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी ( Goods and Service Tax) काऊन्सिलची बैठक स्वराज भवन नवी दिल्ली येथे होणार आहे. सीतारामन यांच्या एक्स वरील पोस्टनुसार ही बैठक शनिवारी सकाळी होणार असल्याचे समजत आहे. जीएसटी दर व त्याच्याशी संबंधित नियतकालिक पुनरावलोकन करण्यासाठी ही बैठक होत असते. या बैठकीत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री एम पी चौधरी देखील उपस्थित राहणार असल्याचे सीतारामन यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
 
 
भारतातील अर्थव्यवस्थेतील परिस्थिती त्याला संलग्न असलेल्या कराचे उत्पन्न या सगळ्यांचा विचार करून जीएसटी दर ठरवले जातात.यंदा ही ५२ वी जीएसटी काऊन्सिल बैठक होणार आहे. वेगवेगळे स्टेक होल्डर, व्यवसायिक, तज्ञ, फायनान्शिअल इकोसिस्टीम साठी काम करणारे, उद्योगपती, जनता सगळ्यांचे या बैठकीकडेलक्ष लागले आहे. विशेषतः अप्रत्यक्ष करावर या दराचा परिणाम होऊन अर्थव्यवस्थेतील उत्पादन व सेवांवर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम होत असल्याने या बैठकीला महत्व प्राप्त झाले आहे.