Asian Games 2022 : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामना पावसामुळे रद्द; तरीही भारताला गोल्ड

    07-Oct-2023
Total Views |
Indian Cricket Team Won Gold Medal
 
मुंबई : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील अंतिम सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. तरीदेखील भारतीय क्रिकेट संघाला विजेता घोषित करण्यात आले आहे. भारतीय संघाची रँकिंग सर्वोत्तम असल्यामुळेच विजेता म्हणून घोषित करण्यात आले असून गोल्ड मेडल आपल्या नावे केले.

दरम्यान, भारतीय क्रिकेट संघ आणि अफगाणिस्तान क्रिकेट संघ यांच्यात सुवर्णपदकासाठी अंतिम सामना खेळविला जाणार होता. परंतु, नाणेफेक होण्याआधीच पावसाने हजेरी लावली. त्यामुळे न थांबणाऱ्या पावसामुळे अखेर सामना रद्द करावा लागला. तर सर्वोत्तम गुणांच्या आधारावर भारतीय संघाला सुवर्णपदक देण्याचे निश्चित करण्यात आले.
 
आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३ मधील क्रिकेटच्या अंतिम सामन्यात भारत आणि अफगाणिस्तानचे संघ आमनेसामने होते. हा सामना चीनमधील हांगझोऊ येथे आयोजित करण्यात आला होता. भारतीय क्रिकेट संघ हा सामना जिंकून इतिहास रचू शकला. हा संघ प्रथमच आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होत असून त्याची आतापर्यंतची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे.

दरम्यान, रवी बिश्नोई, अर्शदीपने भारताला यश मिळवून दिले, तर ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात भारत पहिल्यांदाच आशियाई क्रीडास्पर्धेत सहभागी झाला होता. अफगाणिस्तानने पहिल्यांदा फलंदाजी करताना १८२ षटकांचा खेळ करत ५ बाद ११२ धावा केल्या होत्या.