नांदेड रुग्णालय मृत्यू प्रकरणात फडणवीसांनी टोचले ठाकरेंचे कान! म्हणाले, "अशा घटनांमध्ये..."

    07-Oct-2023
Total Views |

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray 
 
 
मुंबई : नांदेड घटनेचे विरोधांकडून राजकारण सुरु आहे. उबाठा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांनी नांदेड घटनेवर बोलताना सरकारवर ताशेरे ओढले. यावरुन आता फडणवीसांनी ठाकरेंचे कान टोचले आहेत. अशा प्रकारच्या घटना गांभिर्याने घेतल्या पाहिजेत. त्यांचे राजकारण करु नये. असा इशारा फडणवीसांनी दिलाय. उद्धव ठाकरे यांची संघटना रामराज्याबद्दल बोलत आहे. पण, त्यांनी रामराज्याची संकल्पना आधीच सोडून दिली आहे. असंही फडणवीस म्हणाले.
 
नांदेड घटनेचे विरोधांकडून राजकारण सुरु आहे. यावर बोलताना फडणवीस म्हणाले, "अशा प्रकारच्या घटना गांभिर्याने घेतल्या पाहिजेत. त्यांचे राजकारण करु नये. अडीच वर्ष तुमचं सरकार होतं. त्यावेळी तुम्ही काय केलं? असा प्रश्न मी सुद्धा विचारू शकतो. पण अशावेळी राजकारण करणे योग्य नव्हे." असं फडणवीस म्हणाले.
 
"संजय राऊतांना मी कधीच उत्तर देत नाही. कारण, संजय राऊत उत्तर देण्याच्या लायकीचे नाहीत. लायकीचे नाहीत, याचा अर्थ ते काहीही बोलतात. काहीही बोलणाऱ्या व्यक्तीला काय उत्तर द्यायचं? पण, उद्धव ठाकरेंची संघटना रामराज्याबद्दल बोलते, याचा मला आनंद आहे. रामराज्याची संकल्पना ठाकरेंच्या संघटनेनं आधीच सोडून दिली आहे.” अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली.