संजय राऊत उत्तर देण्याच्या लायकीचे नाहीत: देवेंद्र फडणवीस
07-Oct-2023
Total Views | 190
मुंबई : राज्य सरकारच्या नाड्या दिल्लीच्या हाती असल्याची टीका उबाठाचे खासदार संजय राऊतांनी केली. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता संजय राऊत उत्तर देण्याच्या लायकीचे नाहीत, संजय राऊत काहीही बोलतात. असा घणाघात त्यांनी केला. उद्धव ठाकरे यांची संघटना रामराज्याबद्दल बोलत आहे. पण, त्यांनी रामराज्याची संकल्पना आधीच सोडून दिली आहे. असंही फडणवीस म्हणाले.
"संजय राऊतांना मी कधीच उत्तर देत नाही. कारण, संजय राऊत उत्तर देण्याच्या लायकीचे नाहीत. लायकीचे नाहीत, याचा अर्थ ते काहीही बोलतात. काहीही बोलणाऱ्या व्यक्तीला काय उत्तर द्यायचं? पण, उद्धव ठाकरेंची संघटना रामराज्याबद्दल बोलते, याचा मला आनंद आहे. रामराज्याची संकल्पना ठाकरेंच्या संघटनेनं आधीच सोडून दिली आहे.”
नांदेड घटनेचे विरोधांकडून राजकारण सुरु आहे. यावर बोलताना फडणवीस म्हणाले, "अशा प्रकारच्या घटना गांभिर्याने घेतल्या पाहिजेत. त्यांचे राजकारण करु नये. अडीच वर्ष तुमचं सरकार होतं. त्यावेळी तुम्ही काय केलं? असा प्रश्न मी सुद्धा विचारू शकतो. पण अशावेळी राजकारण करणे योग्य नव्हे." असं फडणवीस म्हणाले.
राज्यातील ९ मंत्री भ्रष्टाचारी आहेत. मंत्रिमंडळ विस्तारानंतर हे नऊ मंत्री मंत्रिमंडळात दिसणार नाहीत. असं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले होते. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “विजय वडेट्टीवार थोडीच आमचा पक्ष चालवतात. वडेट्टीवार यांना पक्षातून डच्चू मिळणार नाही, याची काळजी घ्यावी.”