रायगड : जिल्हयातील २१० सार्वत्रिक ग्रामपंचायती ६९ ग्रामपंचायतीमधील ९९ रिक्त सदस्य पदासाठी तसेच १० सरपंच रिक्त पदासाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने काल निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यापासून ते निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत आचार संहिता लागू राहील, अशी माहिती उपजिल्हाधिकारी विठ्ठल इनामदार यांनी दिली आहे. तसेच निवडणूक होणाऱ्या जिल्ह्यातील २१० ग्रामपंचायतची यादी प्रसिद्ध केली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेला निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे :
तहसीलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिध्द करण्याचा दिनांक–शुक्रवार,दि.६ ऑक्टोबर, नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक व वेळ–सोमवार, दि.१६ ऑक्टोबर ते शुकवार, दि.२० ऑक्टोबर, वेळ सकाळी ११ ते दुपारी ३ वाजता, नामनिर्देशनपत्र छाननी करण्याचा दिनांक व वेळ (नमुना अ अ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी) सोमवार, दि. २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता पासून छाननी संपेपर्यंत, नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा अंतिम दिनांक व वेळ (नमुना अ अ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी),– बुधवार, दि. २५ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत.
निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक व वेळ–बुधवार, दि.२५ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वा. नंतर, आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक– रविवार दिनांक ५ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३० वा. पासून ते सायंकाळी ५.३० वा. पर्यंत, मतमोजणी व निकाल घोषित करण्याचा दिनांक (मतमोजणीचे ठिकाण व वेळ जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने तहसीलदार निश्चित करतील त्यानुसार राहील) सोमवार दि. ६ नोव्हेंबर रोजी व नक्षलग्रस्त तसेच दुर्गम भागासाठी मंगळवार दि.७ नोव्हेंबर रोजी, जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिध्द करण्याचा अंतिम दिनांक गुरुवार दि.९ नोव्हेंबर पर्यंत.