मुंबई : आयसीसी एकदिवसीय विश्वचषकातील दुसरा सामना पाकिस्तान आणि नेदरलँडस यांच्यादरम्यान, हैदराबाद येथे खेळविला गेला. या सामन्यात पाकिस्तानने पहिल्यांदा फलंदाजी करताना सर्व बाद २८६ धावा केल्या. या आव्हानांचा पाठलाग करताना नेदरलँडसने २०५ धावा केल्या.
दरम्यान, पाकिस्तान विरुद्ध नेदरलँड्स सामन्यात पाकिस्तानने नेदरलँडचा ८१ धावांनी पराभव केला. पाकिस्तानने गोलंदाजी करताना हरिसने ३ विकेट्स घेतले. पाकिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान (७५ चेंडूत ६८) आणि सौद शकील (५२ चेंडूत ६८) यांनी फलंदाजी करताना दोन्ही बाजूंनी डाव सावरल्याने पाकिस्तानने ४९ षटकांत सर्वबाद २८६ धावा केल्या. त्यानंतर नेदरलँड्सचा डाव ४१ षटकांत २०५ धावांवर आटोपला.