मुंबई : इंग्लंड आणि न्यूजीलंड यांच्यातील सामन्याने काल आयसीसी एकदिवसीय विश्वचषकाला सुरूवात झाली. त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी पाकिस्तान आणि नेदरलँडस यांच्यात दुसरा सामना खेळविला जात आहे. नेदरलँडसच्या प्रभावी माऱ्यासमोर पाकिस्तानचा संघ सर्व बाद २८६ धावा करु शकला.
प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघाकडून यष्टीरक्षक मोहम्मद रिजवान आणि सौद शकीलने सर्वाधिक ६८ धावांची खेळी केली. तर नेदरलँडसच्या बॅस डी लीडे याने पाकिस्तान संघाचे चार गडी बाद केले. पाकिस्तानच्या संघाने ४९ षटकांचा सामना करत सर्व गडी बाद २८६ धावांचे आव्हान नेदरलँडसला दिले.