मुंबई : 'भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड'अंतर्गत विविध पदांकरिता अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून पदवीधरांना नोकरीची संधी मिळणार आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्समधील रिक्त जागांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत होणाऱ्या पदभरतीद्वारे प्रोबेशनरी अभियंता आणि प्रोबेशनरी ऑफिसर्स या पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदभरती अंतर्गत एकूण २३२ रिक्त जागा भरण्यात येणार असून प्रोबेशनरी इंजिनिअर, प्रोबेशनरी ऑफिसर, प्रोबेशनरी अकाउंट्स ऑफिसर या पदासाठी ही भरती केली जाणार आहे.
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मधील पदभरतीकरिता अर्जप्रक्रिया सुरू असून उमेदवारांना अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत दि. २८ ऑक्टोबर २०२३ असणार आहे. भरतीसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी
अधिकृत वेबसाईटला भेट द्या.